Monday, June 2, 2014

!! लढवय्या लोकनेत्यास भावपूर्ण आदरांजली !!

  
 
 !! लढवय्या लोकनेत्यास भावपूर्ण आदरांजली !!

 -------------------

महायुतीचे प्रमुख शिल्पकार, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दू:खद निधन झाले... 
बहुजन-राष्ट्रीय समाजाचा आधारवड गेला... 
मा. महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय कार्यालय फोर्ट-मुंबई’तर्फे 
सनी अक्कीसागर आणि मोहन मोटे सर यांनी नरीमन पॉइंट-मुंबई 
येथील महाराष्ट्र भाजपा मुख्य कार्यालयात जावुन आदरांजली वाहीली...

-------------------

लोकनेत्याची पवित्र रक्षा दक्षिण गंगेत विसर्जित

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर ४ जून रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राख सावडण्याचा विधी ५ जून रोजी सकाळी ८.३0 वा. पार पडला. या महानेत्याची पवित्र रक्षा भारताची दक्षिण गंगा असलेल्या गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रात विसर्जित करण्यात आली.

महाराष्ट्राच्या महानेत्याचा बुधवारी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात लाखो जनसागराच्या उपस्थितीत व शासकीय इतमामात आर्य समाज पध्दतीने अंत्यविधी पार पडला. तर गुरुवारी सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. मुंडे - महाजन कुटुंबीयासह जिल्हाभरातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर भारताची दक्षिण गंगा असलेल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गोदावरी पात्रात सकाळी सकाळी ११ वाजता लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पवित्र रक्षा विसर्जित करण्यात आली.

यावेळी कन्या आ. पंकजाताई पालवे, पत्नी प्रज्ञाताई मुंडे, आई लिंबाबाई मुंडे, लहान कन्या यशश्री मुंढे, प्रकाश महाजन, प्रतिभा भातांब्रेकर, ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे, पुतण्या आ. धनंजय मुंडे, जावई अमित पालवे, दुसरे जावई डॉ.गौरव खाडे अजय मुंडे, रामेश्‍वर मुंडे,  राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर,
आ. विनायक मेटे, जुगलकिशोर लोहिया, अशोकशेठ सामंत, रमेश पोकळे, वैजनाथ सोळंके, पवन मोदाणी, दिनकर मुंडे, नामदेव आघाव, रमेश कराड, सतीश मुंडे, नरेश पिंपडे, महादेव ईटके, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मुंढे, तालुकाध्यक्ष बाबूराव पवार, अभय चाटे, धनंजय भेंडेकर, तुकाराम मुंढे, डॉ. सुभाष कदम, बालासाहेब पारवे, बाळू कातकडे, शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटेसह यांच्यासह गंगाखेड शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
( साभार वृत्त : मंगळवेढा लाईव्ह मधून...)

-------------------

  

 -------------------

 * पंकजांताईस मंत्रिपद दिल्यास महाराष्ट्रात महायुतीला फायदा...

* छोट्या माणसालाही मूंडेनी मोठया पदावर नेलं....

* बेरजेचं राजकारण सगळ्या समाज घटकांना घेवून करावं...

* मुंडे'च्या आदरांजलीसाठी महायुतीत समन्वय रहावा...

* महायुती समन्वयाद्वारे राज्यातील प्रश्न सोडवेल...

* विधानसभेवर महायुतीचाचं झेंडा फडकणार आहे...

- महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
( दि. 06/06/2014 : ' Tv9 महाराष्ट्र ' या वृत्तवाहीनीवर दिलेल्या मुलाखातीतुन...)

No comments:

Post a Comment