Thursday, June 26, 2014

भगवानगडाचे आशीर्वाद पंकजाताई'च्या पाठीशी तर महादेवजी जानकर गोपीनाथराव मुंडेचे मानसपुत्र - महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप


बीड : ( प्रतिनिधी )  
पंकजाला भगवानगड ओटीत घेत असून पंकजाताई आजपासून भगवानगडाची कन्या आहे. भगवानगडा'चे आशीर्वाद पंकजाताई'च्या पाठीशी तर महादेवजी जानकर गोपीनाथराव मुंडेंचे मानसपुत्र.   
- महंत डॉ. नामदेवशास्त्री सानप

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत पंकजाताई'च्या पाठीशी राहणार असून चोंडीच्या मेळाव्यात ताईचं आता अध्यक्ष राहणार. धनगर - वंजारी वज्रमूठ तूटू देणार नाही.
-
महादेवजी जानकर

मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे हे माझे सर्वात मोठे ध्येय !
-
पंकजाताई मुंडे - पालवे

कै. मुंडे साहेब यांचे अस्थीकलश दर्शनासाठी बीड येथील भगवानगडावर मोठा जनसागर लोटला होता. कै. मुंडे साहेब मंत्री झाल्यावर येथे दर्शनासाठी आले होते. भगवानगड वंजारी समाजाचे प्रेरणा आणि आराध्यस्थान आहे.

Thursday, June 12, 2014

महादेव जानकर यांचा योग्य मान राखला जाईल... - विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते


( साभार वृत्त : दै. पुढारी, पुणे, दि.10/06/2014 )  
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=461225&boxid=23418713&pgno=6&u_name=0

लोकनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली...

दि. 07/06/2014 - औरंगाबाद (प्रतिनिधी) :   
लोकनेते मुंडे साहेबांना श्रद्धांजली वाहताना व त्यांच्याविषयी बोलत असताना महादेवजी जानकर एवढे भावुक झाले होते की काही मिनिट ते स्तब्धचं उभे राहिले... त्यांना आपले अश्रु ही रोखता आले नाही...

Sunday, June 8, 2014

एवढे औदार्य केवळ मुंडे साहेबांकडेचं... - महादेव जानकर

( साभार :दै. तरुण भारत, बेळगाव, दि. 08/06/2014, पान क्रमांक - 2 मधून...)
http://epaper.tarunbharat.com/c/2961053

लोकनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली...

(साभार : दै. दिव्य मराठी, औरंगाबाद, दि. 08/06/2014)

 (साभार : दै.लोकमत, औरंगाबाद, दि. 08/06/2014)

 (साभार : दै. झुंजार नेता, बीड, दि. 08/06/2014)

Tuesday, June 3, 2014

मुंडे यांच्या दौ-याची चौंडीकरांना हुरहुर... (साभार : दै. लोकमत, दै. पुण्यनगरी, पुणे आदि. वृत्तपत्रांमधून, दि. 04/06/2014...)
 
-------------------------------------------

मुंडे यांच्या दौ-याची चौंडीकरांना हुरहुर... 
अहमदनगर ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडी येथे घेतला होता, तो त्यांचा शेवटचाच कार्यक्रम ठरला. त्याचीच हुरहुर चौंडीकरांना लागली आहे.
गेल्या शनिवारीच मुंडे चौंडीला येऊन गेले. त्यानंतर तीनच दिवसांनी मंगळवारी त्यांचे अपघाती निधन झाले. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी मुंडे गेल्या शनिवारी चौंडीला आले होते. केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा त्यांचा नगर जिल्हय़ातीलच नव्हेतर राज्यातील पहिलाच कार्यक्रम होता. दुर्दैवाने तोच शेवटचाही ठरला.ताज्या आठवणींमुळे चौंडीकरांना मुंडे यांच्या निधनाची अधिक हुरहुर लागली. विशेष म्हणजे मुंडे त्या दिवशी भलतेच खुशीत होते. केंद्रात सत्तापरिवर्तन झाले, येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही सत्तापरिवर्तन होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकणार असा दावा त्यांनी केला होता. तसेच केंद्राच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद असलेले ग्रामविकास खाते आपल्याला मिळाले आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेऊन ग्रामीण भागाचा चेहरामोहरा येत्या पाच वर्षांत बदलू असा संकल्पही त्यांनी या कार्यक्रमात सोडला होता.
चौंडी येथे मुंडे यांनी त्यांच्या राजकीय वारसदाराबाबतही भाष्य केले होते, त्यामुळे तर चौंडीकर अधिकच भावनिक झाले आहेत. आपल्याला मुलगा नसल्यामुळे महादेव जानकर हेच आपले राजकीय वारसदार आहेत असे सुतोवाच त्यांनी या कार्यक्रमात केले होते, त्यामुळेच या अपघाताची त्यांना चाहूल लागली होती की काय, अशी शंकाही आता उपस्थित होऊ लागली आहे. जानकर यांची त्यांनी येते मुक्तकंठाने स्तुतीही केली. बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता. एका अर्थाने ते त्यात विजयी झाले आहेत, असे मुंडे म्हणाले होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू असे आश्वासनही त्यांनी दिले होते.
कार्यक्रमानंतर मुंडे यांनी येथेच त्यांचे जुने सहकारी अण्णा डांगे यांचीही भेट घेतली होती. बीड, परळी येथील कार्यकर्तेही त्यांना भेटण्यासाठी मोठय़ा संख्येने येथे आले होते. या घाईच्या दौ-यातही त्यांनी हेलिपॅडवर या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. मुळातच चौंडीच्या विकासात मुंडे यांचाच पुढाकार होता. राज्यात युतीचे सरकार असताना त्यांनी हा पाया रोवला, त्यानंतर अनेक वेळा त्यांनी येथे भेटी दिल्या. अहल्यादेवींचाच आदर्श डोळय़ांसमोर ठेवून आम्ही केंद्रात राज्य कारभार करू, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली होती. या सा-या ताज्या आठवणींनी चौंडीकर आता मात्र उद्विग्न झाले आहेत.
बातमी  लिंक >>>
( साभार : दै .लोकसत्ता'मधून, दि. 05/06/2014, अहमदनगर)

-------------------------------------------

(साभार : दै. सुराज्य, सोलापुर'मधून...)

Monday, June 2, 2014

!! लढवय्या लोकनेत्यास भावपूर्ण आदरांजली !!

  
 
 !! लढवय्या लोकनेत्यास भावपूर्ण आदरांजली !!

 -------------------

महायुतीचे प्रमुख शिल्पकार, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे दू:खद निधन झाले... 
बहुजन-राष्ट्रीय समाजाचा आधारवड गेला... 
मा. महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय कार्यालय फोर्ट-मुंबई’तर्फे 
सनी अक्कीसागर आणि मोहन मोटे सर यांनी नरीमन पॉइंट-मुंबई 
येथील महाराष्ट्र भाजपा मुख्य कार्यालयात जावुन आदरांजली वाहीली...

-------------------

लोकनेत्याची पवित्र रक्षा दक्षिण गंगेत विसर्जित

महाराष्ट्राचे लाडके लोकनेते, केंद्रीय ग्रामविकासमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर ४ जून रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राख सावडण्याचा विधी ५ जून रोजी सकाळी ८.३0 वा. पार पडला. या महानेत्याची पवित्र रक्षा भारताची दक्षिण गंगा असलेल्या गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रात विसर्जित करण्यात आली.

महाराष्ट्राच्या महानेत्याचा बुधवारी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात लाखो जनसागराच्या उपस्थितीत व शासकीय इतमामात आर्य समाज पध्दतीने अंत्यविधी पार पडला. तर गुरुवारी सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम पार पडला. मुंडे - महाजन कुटुंबीयासह जिल्हाभरातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर भारताची दक्षिण गंगा असलेल्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील गोदावरी पात्रात सकाळी सकाळी ११ वाजता लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पवित्र रक्षा विसर्जित करण्यात आली.

यावेळी कन्या आ. पंकजाताई पालवे, पत्नी प्रज्ञाताई मुंडे, आई लिंबाबाई मुंडे, लहान कन्या यशश्री मुंढे, प्रकाश महाजन, प्रतिभा भातांब्रेकर, ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे, पुतण्या आ. धनंजय मुंडे, जावई अमित पालवे, दुसरे जावई डॉ.गौरव खाडे अजय मुंडे, रामेश्‍वर मुंडे,  राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर,
आ. विनायक मेटे, जुगलकिशोर लोहिया, अशोकशेठ सामंत, रमेश पोकळे, वैजनाथ सोळंके, पवन मोदाणी, दिनकर मुंडे, नामदेव आघाव, रमेश कराड, सतीश मुंडे, नरेश पिंपडे, महादेव ईटके, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मुंढे, तालुकाध्यक्ष बाबूराव पवार, अभय चाटे, धनंजय भेंडेकर, तुकाराम मुंढे, डॉ. सुभाष कदम, बालासाहेब पारवे, बाळू कातकडे, शिवसेना तालुकाप्रमुख विष्णू मुरकुटेसह यांच्यासह गंगाखेड शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
( साभार वृत्त : मंगळवेढा लाईव्ह मधून...)

-------------------

  

 -------------------

 * पंकजांताईस मंत्रिपद दिल्यास महाराष्ट्रात महायुतीला फायदा...

* छोट्या माणसालाही मूंडेनी मोठया पदावर नेलं....

* बेरजेचं राजकारण सगळ्या समाज घटकांना घेवून करावं...

* मुंडे'च्या आदरांजलीसाठी महायुतीत समन्वय रहावा...

* महायुती समन्वयाद्वारे राज्यातील प्रश्न सोडवेल...

* विधानसभेवर महायुतीचाचं झेंडा फडकणार आहे...

- महादेव जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष
( दि. 06/06/2014 : ' Tv9 महाराष्ट्र ' या वृत्तवाहीनीवर दिलेल्या मुलाखातीतुन...)

लोकबंधु महादेवजी जानकर यांचा सत्कार करताना आमदार अनिलजी परब...

दि. 01/06/2014, स्थळ : शहाजीराजे क्रीडा संकुल, अंधेरी -  मुंबई.
 शिवसेना पक्ष आयोजित जल्लोष विजयी विरांचा या कार्यक्रमात 
लोकबंधु महादेवजी जानकर यांचा सत्कार करताना  आमदार अनिलजी परब...

Sunday, June 1, 2014

महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव उत्साहात संपन्न...

महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मभूमी चोंडीच्या दिशेने...

राष्ट्रीय समाज पक्षा’तर्फे चोंडी गावी महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन...

बहुजन - राष्ट्रीय समाजा’साठी  गेली 25 वर्षे आपले घर – दार सोडणारे लोकबंधु महादेव जानकर यांची आई – गुणाबाई आपल्या मुलाशी अर्थात महादेवजी जानकर यांच्याशी हितगुज करताना... सभा ठिकाणी आई – मुलाची अशी भेट होत असते... राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित महाराणी अहिल्याबाई होळकर आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमा अगोदर अशाचं एका भेटीचा प्रसंग...

आमदार माधुरीताई मिसाळ, खासदार दिलीप गांधी, रा.स.प’चे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, खासदार सदाशिव लोखंडे, केंद्रीय ग्रामविकासमंत्री व खासदार गोपीनाथ मुंडे, आमदार अनिल गोटे, भा.ज.पचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार प्रकाश शेंडगे, आमदार प्रा. राम शिंदे व इतर महायुतीचे मान्यवर...

 
सभेठिकाणी उपस्थित विराट जनसमुदाय...

 
काठी आणि घोंगडी देवुन सत्कार करताना...


 
सुभेदार मल्हारराव होळकर गौरव पुरस्कार मा. गोपीनाथ मुंडे यांना प्रदान...
सभेठिकाणी उपस्थित विराट जनसमुदाय...  

कमालीच्या उन्ह आणि गर्मीतही चोंडी गावी तूफान गर्दी...