Thursday, March 27, 2014

महायुती + महादेव जानकर = महापरिवर्तन + महाविजय !

‘रानोमाळ ते बारामती’... महादेव जानकर - एक प्रवास...

रानोमाळ ते बारामती’... महादेव जानकर - एक प्रवास...
बारामतीला गरज बदलाची... बदल आम्हीं घडविणार !
महादेव जानकर लाखात एक नव्हे तर करोडोत एक असे व्यक्तिमत्व आहेत. उच्च ध्येय, दूरदृष्टी, स्पष्ट लक्ष्य, सातत्य पूर्ण कार्यक्रम, राजकीय ध्येयवाद, अथक परिश्रम, तसेच ज्ञान आणि नितीचा उत्कुष्ट संगम म्हणजे महादेव जानकर. भटकनार्या माता गुनाबाई आणि पिता जगन्नाथ यांच्या पोटी सातार्याच्या एका रानमाळावर महादेवचा जन्म झाला. गावी, तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत बी. ई. झाला. कॉलेज जिवनापासून नेतृत्व करणारे महादेव जानकर १९९३ साली यशवंतसेनाप्रमुखबनले. भटकनार्या माता - पित्याचा पुत्र समाजकारणासाठी - राजकारणासाठी भटक्या बनला. चांगली नोकरी करुन सुखाचा संसार थाटण्याचे सोडून, तारुण्य सुलभ भावनेचा त्याग करुन, “समाजाचा संसारथाटण्याचा निर्धार तरुण महादेव जानकर याने केला. घरी जाणार नाही, नाते - संबध ठेवणार नाही, स्व-संपत्ती बनविणार नाही, लग्न करणार नाही आणि राष्ट्रीय समाजला सत्ता, संपत्ती, सन्मान मिळवून देण्यासाठी आजन्म कार्यरत राहीन, अशी भीष्म प्रतिज्ञामहादेवने घेतली. एका खडतर प्रवासाचा आरंभ महादेव जानकर सुरु केला. १९९३ ते आजतागायत ते शपथेस जागले. यशवंतसेनेला त्यांनी केडर बेसड, मास बेसड, ब्रॉड बेसड बनविले.

राजकारण हेच समाजकारणासाठी सर्वात मोठे साधन मानून महादेव जानकर कार्यरत राहिले. त्यातुनच २९ ऑगस्ट २००३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झाला. महात्मा फुले यांचे आणि महारानी अहिल्याबाई होलकर यांचे क्षेत्र कटगुण आणि चोंडी यांना सामाजिक आणि राजकीय तीर्थक्षेत्र बनविले. राजे उमाजी नाइक यांचे जन्मगाव भिवडीला राजकीय तीर्थक्षेत्र बनविले. राष्ट्रीय समाजाला, त्यातही उपेक्षित - दुर्लक्षित बहुजन समाजाला ओबीसी - आदिवासी - दलित अल्पसंख्याक समाजाला सत्तेत घेवून जाणे, हे मुख्य लक्ष्य केले. त्यासाठी देशातील सर्वात मोठी पावरज्या ठिकाणी आहे, अशासंसद भवन - दिल्लीला लक्ष्यकरुन वाटचाल सुरु केली. सत्य शोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन हे सूत्र केले. त्यासाठी अनेक जागृती कार्यक्रम राज्य तसेच देश पातळीवर केले. ग्रामपंचायत ते विधानसभा - लोकसभा लढविल्या आणि जिंकल्या. आपल्या पक्षाचा एक आमदार निवडून आणला. स्वत: महादेव जानकर यांनी सर्वप्रथम १९९८ साली नांदेड लोकसभा लढविली, तिसर्या नंबरची मते मिळवली. राष्ट्रीय समाज पक्षाने २००४ सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीतुन संसदीय लढाईत प्रवेश केला. महाराष्ट्र - ११ आणि कर्नाटक - १ जागा स्वबळावर लढविल्या. पहिल्याच निवडणूकीत दिड लाखा पेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात १० व्या नंबरची पार्टी ठरली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत दिड लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात ८ व्या नंबरची पार्टी ठरली. २००६ साली महादेव जानकर यांनी सांगली लोकसभा लढविली, तिसर्या नंबरची मते मिळवली. २००९ साली रासपने महाराष्ट्र २९ आणि कर्नाटक , आसाम , गुजरात -१, बिहार -१ अशा ३४ जागा स्वबळावर लढविल्या. स्वत: महादेव जानकर यांनी माढा येथून शरद पवार विरुद्ध निवडणूक लढवुन लाखभर मते मिळवली. २ लाखा पेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात ५ व्या नंबरची पार्टी ठरली. नंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत १ आमदार सहित २ लेखा पेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात ५ व्या नंबरची पार्टी ठरली. आज रोजी रासपचे अनेक पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तालुका पंचायत सदस्य निवडून आले आहेत. २ जिल्हा परिषद आहेत. रासप ही खर्या अर्थाने जन-पार्टी आहे. निष्ठावान कार्यकर्ते आणि जनतेचा निधि यावर रासपने येथपर्यंत प्रवास केला. महादेव जानकर सारखे त्यागी तसेच सक्षम नेतृत्व यांच्यामुळे रासपा महायुतीपर्यंत पोहोचली. आमदार - खासदार - मंत्री - मुख्यमंत्री - प्रधानमंत्री पेक्षा नेतामोठा असतो. महादेव जानकर असेच एक नेता आहेत. एक राष्ट्रीयनेता आहेत. आपल्या पक्षाला राष्ट्रीयसमाज पक्ष, असे नाव महादेव जानकर यांनी दिले.. जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश या ना त्या कारणाने भारत देशाला विभागले आणि तोडले जात असताना राष्ट्रहे सर्वात मोठे असे मानणारा समाज म्हणजे राष्ट्रीय समाजआणि अशा राष्ट्रीय समाजाची पार्टी म्हणजे राष्ट्रीय समाज पार्टी, असे सांगत संसदीय लोकशाही राजकारणात महादेव जानकर यांनी प्रवेश केला. ब्राह्मण - मराठा ते जैन - दलित, आदिवासी, अल्पसंख्य समाजाला ते राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतात. एकात्म राष्ट्र निर्माण, त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनविले आहे. संपूर्ण देशभरात महादेव जानकर यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे.

सार्वजानिक जीवनाच्या २५ वर्षानंतर वाट चालत महादेव जानकर यांनी बारामतीलोकसभा क्षेत्रास आपले कुरुक्षेत्रकेले आहे. बारामतीलोकसभा क्षेत्रातुन महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जनतेसमोर उभे आहेत. आधुनिक युगातील महा-भारताचे चक्रव्युह भेदण्याचा प्रयत्न महादेव जानकर नामे अभिमन्यु - ५ वा पांडव करीत आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत हा देशाचा आज मुख्य अजेंडा बनला आहे. परंतु भ्रष्टाचारचा बादशाहाआणि त्याची टोळी निवडून येतोच कसा, हा मुख्य सवाल भारतासमोर असला पाहिजे. भारतीय जनता प्रामाणिक आहे, मतदारही सुज्ञ आहेत. भारतीय मतधारकांचे मत खरेदी केले जात आहे (पैसा ते दारू देवुन), लुटले जात आहे (दड़पशाही करुन - बूथ कॅप्चर करुन), आणि फसवुन घेतले जात आहे (दिशाभूल करुन - खोटा प्रचार करुन). विकास सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी रासपाचा जन्म झाला आहे. मुठभर लोकांचा / घरानेचा विकास म्हणजे संपूर्ण विकास असे नव्हे, तर विकास हा सर्वदूर / सर्वांसाठी असला पाहिजे. दादागिरी - घरानेशाही नव्हे तर लोकशाही खरया अर्थाने दिसली पाहिजे. सर्वांगीण राष्ट्रीय विकास आणि समान राष्ट्रीय भागीदारी हा रासपाचा प्रमुख अजेंडा आहे. देशात आणि राज्यात सर्वात अधिक काळ कॉंग्रेस - राष्ट्रवादी आणि त्यांचे आघाडी सरकार सत्तेवर आहेत. देशाच्या आणि देशातील जनतेच्या मागासलेपणाला केवळ तेच जबाबदार आहेत, असा स्पष्ट आरोप करीत महायुतीच्या माध्यमातून बारामतीमतदार संघातील निवडणूकीत मला आणि माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला मत अधिकाराचा योग्य वापर करीत प्रचंड मतानी विजयी करा असे, आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे. भारत निर्माण हा भाजपचा तसेच शिवसेनेचा संकल्प आहे. शिवरायांच्या मावळे सारख्या निष्ठावंत कर्यकर्त्यांची फौज म्हणजे शिवसेना. बलशाली भारत निर्माणासाठी झटणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज म्हणजे भारतीय जनता पार्टी. सामाजिक समतेसाठी झटणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज म्हणजे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले). सर्वाना अन्न देणार्या शेतकर्यांसाठी झटणार्या निष्ठावंत कार्यकर्त्याची फौज म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना. सर्वापरी राष्ट्र मोठे असे मानणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज म्हणजे राष्ट्रीय समाज पार्टी. अशा ५ पांडवांची महायुती एक समर्थ आणि योग्य पर्याय म्हणून महाराष्ट्रात उभी आहे. अशा महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करीत महायुतीची शक्ती वृद्धिंगत आणि मजबूत करा, असेही आवाहन मा. महादेव जानकर यांनी केले आहे. भारताला बदलाची गरज आहे. पंतप्रधान पदाचे दावेदार - भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी परिवर्तनाची लहर देशात निर्माण केली आहे. बारामतीला गरज बदलाची... बदल आम्ही घडविणार ! असे महादेव जानकर म्हणतात. तात्पर्य राज-पुत्र ते राजा असा महादेव जानकर यांचा प्रवास नसून तो रानोमाळ ते संसद भवन असा आहे. ही लढाई धनशक्ति विरुद्ध जनशक्ति अशी असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार - कृषिमंत्री मा. शरद पवार यांची कन्या श्रीमती सुप्रियाताई सुळे यांना पराभूत करुण जायंट किलर ठरणार असा विश्वासही मा. जानकर यांनी व्यक्त केला आहे. अशक्य वाटावे अशा ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न न थकता, मोठया चिकाटीने महादेव जानकर करीत राहिले आहेत. निवडणूकीच्या या लढाईत विजयी होवून - खासदार होवून ते संसद भवनला पोहोचणार का, एवढाचं सवाल आहे....

महादेव जानकरांच्या प्रचारार्थ महायुतीचा झंजावात...