Wednesday, November 27, 2013

आधुनिक सामाजिक भारत के प्रणेता महात्मा जोतीराव फुले

॥ ख्रिस्त,  महमद, मांग,  ब्राह्मणाशी,  धरावे पोटाशी बंधुपरी ॥
- महात्मा जोतीराव फुले 
 
एकात्म राष्ट्रवाद हाच फुलेवाद...
- लोकबंधु महादेवजी जानकर
( राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष )
 
-------------------------------------------
 
आधुनिक सामाजिक भारत के प्रणेता
महात्मा जोतीराव फुले
 
भारत मे अनेक साधू , संत,  ऋषि,  मुनि हुए,
ईश्वर अवतारित हुए, ऐसा कहा जाता है...
 
लेकिन अर्वाचीन भारत मे
आम भारतीय जनता के जीवन को
सही मायने मे आकार तथा आधार
जिनके कार्य-कर्तुत्व से मिला
उस महामानव का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
आम हिन्दू समाजके लिए
ज्ञान का दरवाजा खुले करनेवाले
महा-ज्ञानदेव का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
शुद्र मानकर (ब्राह्मणी सहित )
जिन्हें ज्ञानसे वंचित रखा गया
उन 50% महिलाओंके लिए
ज्ञान का दरवाजा
भारतमे सबसे पहिले खोलनेवाले
महापुरुष का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
ब्रिटिश राजपुत्र ड्यूक ऑफ़ कॅनोट को
पुनाके ( 2 मार्च 1888 ) प्रतिष्टित लोगोंसे भरी सभा में
Salvation of India lies...
Only in Education, Education and Education...
ऐसा कहनेका धैर्य रखनेवाले
महान धैर्यधर का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
भारत की पहिली लेबर मूवमेंट चलानेवाले
भारतके प्रथम लेबर लिडर नारायण मेघाजी लोखंडे के
महागुरु का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
जिनके विचारोंके मार्गपर चलकर
‘राजर्षि’ के सन्मान तक पहुचे
उस छत्रपती शाहू महाराजाके
मार्गदर्शक का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
" जी हाँ,  मै महात्मा जोतीराव फुले का अनुयायी हूँ.
इस देश का, इस देश की जनता का हित 
तथा उज्वल भविष्य
केवल फुले विचारो में
फुलेवाद में है "
ऐसे बड़े आत्मविश्वास से कहनेवाले
बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकरजी के
महागुरु का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
प्राचीन, मध्य युगीन, अर्वाचीन
तथा आधुनिक भारत के इतिहासमें
"आधुनिक सामाजिक भारत के प्रणेता"
"Father of Modern Social India"
इस नाम से भारत के ही नहीं
बल्कि दुनिया के इतिहास में लिखना पड़ेगा,
उस महान युगपुरुष का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
पुरान मतवाद और नव मतवाद तथा
उसके सुवर्ण मध्यको पकड़ने वाले
मध्यममार्गी मतवाद को लेकर
हिन्दू, मुस्लिम, पारसीओं मे संघर्ष छिड़ा था,
तब सत्य क्या है,  असत्य क्या है
इसका शोध करने वाले
सत्य शोधक समाज की स्थापना करनेवाले
महानुभाव का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
अलग जाती, संप्रदाय, भाषा तथा धर्मावलाम्बिओंको
आदि - अंती और मध्यमी
कल्याणकारी
सार्वजनिक सत्यधर्म देनेवाले
धर्मात्मा का नाम है,  महात्मा जोतीराव फुले.
 
- एस. एल. अक्कीसागर
 
-------------------------------------------
 
28 नवंबर 2013
महात्मा जोतीराव फुले स्मृति दिन के उपलक्ष्य में
उनकी स्मृति तथा विचारोंको
फुलेवाद को
विनम्र अभिवादन !
 
 देश के कोने - कोने में
फुलेवाद का नारा
यह रा.स.प का वादा...
- लोकबंधु महादेवजी जानकर
  ( राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष )
 
-------------------------------------------
 
{ 1888 - मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने जोतीराव फुले यांचा सत्कार करून त्यांना 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. }

Thursday, November 21, 2013

यशवंत नायक ( Yashwant Nayak, Monthly, Nov. 2013 )

वळसंग येथे टिपू सुलतान जयंती'चे आयोजन..रा.स.प जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या हस्ते मीरवणुकीचा शुभारंभ.


महामार्गावर खड्डयांची मोजदाद करताना राष्ट्रीय समाज पक्ष युवक आघाडी'चे कार्यकर्ते...


विमा दवाखान्याचा कारभार सुधारा...अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा रा.स.प'चा इशारा...


पक्षादेश आल्यास सांगली लोकसभा नीवडणुक लढविणार...श्रावण वाक्षे

Tuesday, November 19, 2013

बारामतीत पाण्यासाठी शेतकरी व रा.स.प'चा आंदोलना'चा इशारा... व पाण्यासाठी उपोषणला बसणारे अंध सामाजिक कार्यकर्ते चंद्रकात कदम यांना रा.स.प'चा पाठिंबा...


शेतकर्यांना न्याय मीळवुन देण्यासाठी नीवडणुकिच्या रिंगणात - महादेव जानकर


राष्ट्रीय समाज पक्ष की ओ़र से आप सभी को संत कनकदास जयंती की हार्दिक शुभकानाए...


!! संत कनकदास !!

संत कनकदास जयंती दि. २० नोव्हेंबर २०१३ निमित्त...

र्नाटक राज्यात संत बसवेश्वरानंतर संत कनकदासांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. 20/11/13 रोजी राष्ट्रीय समाजातील एका महान संताची, संत कनकदासांची जयंती आहे. कर्नाटक राज्यात संत कनकदास जयंती निमित्त राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. संत तुकाराम महाराज प्रमाणे संत कनकदासांनी बहुजन हिताय - बहुजन सुखाय कार्यासाठी आपले जीवन अर्पण केले होते.कनकदासांची कीर्तने आट, आडी , जपे, त्रिपुरा, एका , त्रिविड, चप्पू , मटे आदि तालामध्ये कन्नड भाषेत गायली व म्हणली जातात. मोहन तरंगणी, नल चरित्र , भारत कथा अमृत यांसारखी अनेक सुंदर काव्ये, संत कनकदासांनी लिहली व गायिली. राणा प्रताप सिंगाने कनकदासांच्या स्मरणार्थ 'कनकवृंदावन' बांधले असे देखील म्हणतात. संत कनकदासांच्या साहित्यावर अनेकांनी प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली आहेत. अनेक कनकपीठे तयार करण्यात आलेली आहेत.जात / पंथ / धर्म या पलीकडे जावून सर्व थरातील लोक कनकदासांच्या साहित्याकडे आकृष्ट झालेले दिसतात. श्रीकृष्णाचे भक्त असलेले संत कनकदासांनी भारतातील जातीभेदाबद्दल, उच्च वर्णीय मानसिकतेवर जबरदस्त हल्ले त्याकाळी केले होते. श्रीकृष्णदेवरायाने संत कनकदासांची आठवण म्हणून कनकगोपूर बांधले होते. परन्तु काही वर्षापूर्वी संत कनकदासांचे स्मारक 'कनकगोपूर'चा काही कर्मठ पुरोहितांनी विध्वंस केले होते . 7 जानेवारी 2005 रोजी कनकगोपूर विध्वंस निषेधार्थ धनगर / कुरुबा / कुरुमा / पाल / रबारी आदी भारतभरातील मेषपालक / Shepherds सहित तमाम बहुजन / राष्ट्रीय समाजाने कर्नाटक राज्याच्या ’बेंगळूरू' येथे एक विराट मोर्चाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री सिद्धरामैया, महादेवजी जानकर सहित तमाम देशभरातील राष्ट्रीय समाजातील मान्यवरांनी या मोर्चात सहभागी होऊन, तीव्र रोष व्यक्त करून, विध्वंसकांना त्वरित अटक करून ' कनक गोपूर ' जैसे थे बांधून देण्याची मागणी त्यावेळी शासनाकडे केली होती. अनेक वर्षापासून धनगर ( कुरुबा ) तसेच विविध बहुजन / राष्ट्रीय समाज संघटनेनी संत कनकदासांची जयंती दिन हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावी, अशी मागणी सतत केल्याने , आता गेली काही वर्षे कर्नाटक राज्य शासनाने कनकदास जयंती दिन हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केली असून, शासनातर्फे संत कनकदास जयंतीपर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक शाळा - कॉलेज मध्ये जयंतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. ढोंगबाजीवर, यंत्रवत / औपचारिक कर्मकांडावर हल्ला करताना वरवरच्या शुद्ध- अशुद्ध्तेपेक्षा धर्माच्या 'मुळ' आत्मस्वरूपाला जाणून, त्यानुसार आचरण करा, असा उपदेश कनकदास संत कर्मठ पुरोहित वर्गाला करतात आणि किर्तनातून विचारतात...

कुळ - कुलीन म्हणून का मिरवीतो ?
मुळ कुळाचे कोणी का जाणतो ?
आणि ठामपणे सांगतात...
शुद्धी- शुद्धी असे , सारखे का घोकता ?
शुद्धीचा अर्थ, तुम्ही न जाणता !!

संत कनकदास विचारतात...
सांगा, जात कोणती सत्याला ?
पूजेसाठी वाहिले पद्मनाभाला, कमळांचा जन्म चिखलातला !
दुध पूर्णान्न जगताला , मांस - रुधीरातून जन्म झाला !
कस्तुरीचा जन्म कोठून झाला ?
सांगा, जात कोणती हरीला ? सांगा, जात कोणती आत्म्याला ?
सत्याबोध होते जयाला मनी वसे हरी तयाला, सांगा जात कसली साधूला ?

महाज्ञान , विद्वान, भाष्यविंद, साहित्यिक, संगीतज्ञ असलेले असलेल्या संत कनकदासांचा धनगर/शुद्र/ दास म्हणुन व्यासमठात/शिक्षण मंदिरात/ ज्ञान केंद्रात अपमान केला होता.

संत संगाचा आनंद मिळता, तिर्थक्षेत्रांची भटकंती कशाला !
सत्यबोध झाले मनाला, दुख्ख कशाचे असेल तयाला !!

मना चिंता ग्रस्त होवु नकोस, मना शांत हो... मना स्थिर हो !
सर्वांभुती ईश्वर, सर्वाचे रक्षण करील, मना या बद्दल तु निश्चिंत हो !!

हा-तो ? माझे हित करील, यावर विसंबुन राहु नको !
पित्यावर विसंबुन राहिला, प्रल्हाद हि फसला गेला !!

कागिनेलीच्या आदी केशवाकडे पुर्ण विश्वास जयाचे !
तया मिळेल... अक्षत धन - अनंत काळाचे...!!

- संत कनकदास

Kanakdasa asks people to submit themselves to God`s Service, which means SERVICE TO SOCIETY AND HUMANITY.
- Late Sri Sri Sri Beerendra Keshava Tarakanandpuri Swamy – Kaginely Gurupith

(“सत्यशोधक - दंडनायक संत कनकदास“ श्री.एस.एल.अक्कीसागर यांच्या पुस्तकांमधून साभार)

विविध प्रश्न घेवून राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रीय समाज युवक आघाडी'तर्फे 28/11/2013 रोजी धरणे आंदोलन...


बारामतीत दुहेरी टोल आकारणी बंद करा...अन्यथा आंदोलन ; राष्ट्रीय समाज पक्षाचा इशारा !


Tuesday, November 12, 2013

विविध स्थानिक प्रलंबित प्रश्नासाठी रा.स.पा'चे धरणे आंदोलन...


शेतकर्यांच्या थकित बिलापोटी ट्रान्सफार्मर बंद करण्याची मोहीम त्वरित थांबवावी....रा.स.प'चा इशारा.


भटक्या विमुक्त जमाती यांच्याबाबत होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्याबाबत झालेल्या परिषदेत मार्गदर्शन करताना महादेवजी जानकर...


भटक्या विमुक्त जमाती यांच्याबाबत होत असलेल्या 
अन्यायाला विरोध करण्याबाबत झालेल्या परिषदेत मार्गदर्शन करताना महादेवजी जानकर...

माळशिरस, दि.२८.१०.२०१३