Wednesday, August 7, 2013

मी निघालोय क्रांती घडवाया...

मी निघालोय क्रांती घडवाया,
आपल्याविरोधात ज्यांनी राजकारण केलं
त्यांना तुडवाया, त्यांना बडवाया निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
सुर्याला सांगाया मि चाललोय,
पावले आमची केव्हांच बदलल्यात
किरणांची साथ घ्यायची म्हणुन निघालोय.
सोबत तुम्ही येणार का...
अंगवळणी पडलेला हा व्यवहार
कायमचाच बंद करुन टाकायला
धाडसानं मि पुढं-पुढं निघालोय.
सोबत तुम्ही येणार का...
जिवाचं काय बर-वाईट होईल
याची काळजी न करताच धावतोय
शर्यत जिंकायचीच म्हणुन निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
अंधारावर स्वारी करायला आताशी
संधी चालुन हाती आलीय
त्या संधीच सोनं करायला निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
हरण्या-जिंकण्याची पर्वा न करता
लढणार हाय मि त्वेशानं, जोशानं,
शेवटच्या श्वासापर्यंत म्हणुन मि निघालोय,
सोबत तुम्ही येणार का...
 साभार ~ 'दत्ता कोकरे' यांच्या 'आता पेटुन उठा' या कविता संग्रहातुन...

डी.एड, बी.एड धारकांचे प्रश्न सोडविण्याबाबत व महावीद्यालयात प्राध्यापक नेमणुक करण्याबाबत रा.स. विद्यार्थी व युवा आघाडीतर्फे आंदोलन...


Saturday, August 3, 2013

क्रांतिवीर संगोळी रायण्णा...तुझे सलाम !!!

क्रांतिवीर संगोळी रायण्णा
...जेव्हां क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांना पकडण्यात आले तेव्हां त्यांच्या तोंडी शब्द होते,
या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे, हीच माझी शेवटची इच्छा आहे. मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायण्णा खरोखर थोर क्रांतिकारक होते...


 क्रांतिवीर संगोळी रायण्णा
 (जन्म : 15 ऑगस्ट 1798 - मृत्यू : 26 जानेवारी 1831)
  
 क्रांतिवीर संगोळी रायण्णा'विषयी अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी कृपया पुढील लिंक पहावे >>>

Friday, August 2, 2013