Wednesday, October 3, 2012

29 सप्टेंबर 1994 चा दिन - मासिक यशवंत नायक'चा 19 वा स्थापना दिन...


श्री. सिद्धनाथ क्षेत्र म्हसवड (तालुका माण,जिल्हा सातारा) येथे माणगंगेच्या तीरावर झालेल्या विराट धनगर-बहुजन समाज समुहासमोर मा. कांशीराम यांचे हस्ते यशवंत नायक च्या पहिल्या हस्तलिखिताचे उद्घाटन 29 सप्टेंबर 1994 रोजी झाले. मा. महादेव जानकर यांच्या तरुण आणि तड़फदार नेतृत्वाखाली यशवंतसेना सामाजिक आणि राजकीय अन्याय-अत्त्याचार विरुद्ध संघर्ष करीत होती. सरसेनापती यशवंतसेना मा. महादेव जानकर 29 सप्टेंबर 1994 रोजी संपादक - मासिक यशवंत नायक बनले. वाचक समाजाला लेखक समाज बनविणे, यशवंत नायक चे एक प्रमुख लक्ष्य होते. यशवंत नायक चे अनेक वाचक आताशा लेखक, पत्रकार, लेखक, कवी बनुन वावरत आहेत. प्रजा समाजाला राजा समाज (शासक समाज) बनविणे, यशवंतसेनेचे प्रमुख लक्ष्य होते. त्याचप्रमाणे यशवंत नायकचे ही प्रजा समाजाला राजा समाज (शासक समाज) बनविणे, हे देखील एक लक्ष्य होते. यशवंत नायक'च्या माध्यमातुन राष्ट्रीय समाज पक्ष जन्माला आला.
29 ऑगस्ट 2012 रोजी राष्ट्रीय समाज पक्षा'चा 9 वा वर्धापन दिन माढ़ा लोकसभा मतदार संघातील माळशिरस येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला. रासपने 2 लोकसभा लढविल्या. 1 आमदार निवडुन आणला. 2003 साली येल्डा पॅटर्न राबवून 1 ली पंचायत समिति जिंकली. 2012 साली 2 जिल्हा परिषद आणि 3 पंचायत समिति जिंकल्या. मासिक यशवंत नायकची 29 सप्टेंबर 1994 रोजी दिन स्थापना झाली. मासिक यशवंत नायक 29 सप्टेंबर 2012 रोजी 19 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.  राष्ट्रीय समाज पक्षा'चा 29 ऑगस्ट 2012 रोजी 9 वा स्थापना दिन साजरा झाला. राष्ट्रीय समाज पक्षाने १० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आपला पक्ष असावा, ही कल्पना ही कोणी केली नव्हती. तेंव्हा मा. महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. 

यशवंतसेना ते राष्ट्रीय समाज पक्ष प्रवास कसा झाला, याचा यशवंत नायक एक साक्षीदार तसाच भागीदारही आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर राष्ट्रीय समाज पक्ष आज एक आगळी वेगळी भुमिका बजावित आहे. निवडणुकीत पक्षनिधी महत्वाचा आणि अत्यावशक घटक बनला असताना राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झाला. माढ़यात शरद पवार यांनी 200 कोटी रुपयांचा रतीब ओतून केवळ साड़े चार लाख मते मिळवू शकले. त्यासमोर महादेव जानकर यांनी केवळ लाखभर रूपये टाकुन लाखभर मते मिळवली. यातुन महादेव जानकर आणि लोकशाही यांचा नैतिक विजय स्पष्ट होतो. तात्पर्य उमेदवार, पक्ष, पैसा यांमध्ये जागृत मतदार प्रभाव टाकु शकतो आणि महादेव जानकर निवडणूक जिंकू येवू शकतात, असा निष्कर्ष यशवंत नायक'ने काढला आहे.
प्रिंट मीडियाचा जमाना मागे पडत असताना सायबर - इलेक्ट्रोनिक मीडियाने जनमानस व्यापले आहे. यशवंत नायक एक छोटे माध्यम होते-आहे. परंतु साध्या परंतु दर्जेदार लेखनातून एक मोठे लक्ष्य गाठले आहे. अशा यशवंत नायक'चा 29 सप्टेंबर 1994 साली प्रकशित हस्तलिखिताचे, आजच्या वाचकांसाठी “राष्ट्रीय समाज ब्लॉगस्पॉट डॉट इन ” माध्यमातून पुन: प्रकाशित करीत आहोत...  

                  { http://www.rashtriyasamaj.blogspot.in/ }

                                              No comments:

Post a Comment