Thursday, November 17, 2011

महाराजा यशवंतराव होळकर चरित्रग्रंथ व धनगर अस्मिता विशेषांक प्रकाशन...

भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर
या संजय सोनवणी लिखित चरित्रग्रंथाचे महाराष्ट्राची सांसकृतिक राजधानी पुणे येथे प्रकाशन...
भाताच्या एका उपेक्षित महानायकाला इतिहासाच्या ढिगा-यातून उकरुन काढण्याचे मोठे काम संजय सोनवणी या लेखकाने केले. धनगर समाजात जन्मलेले व भारतभूसाठी उभं आयूष्य पणाला लावणारे आध्य क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी करणारे महानायक म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय. महाराजा यशवंतराव होळकर यांचेवर संजय सोनवणी लिखित भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा दि. 13 नोव्हे 2011 रोजी नवी पेठ, पुणे येथील प्रत्रकार भवनात मोठ्या थाटामाटात पार पडला. पाक्षिक धनगर अस्मिता पारिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी पाक्षिक धनगर अस्मिताच्या महाराजा यशवंतराव होळकर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून (धनगर-बहुजन) राष्ट्रीय समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. काळाच्या ओघात गाडून टाकलेल्या आपल्या महानायकाच्या इतिहासाला समोर आणल्या बद्दल मा. सोनवणी यांचेवर अक्षरश: उपस्थितांनी स्तूतीसुमनांचा वर्षाव केला, मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. मंचकावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेवजी जानकर, बहुजन समाजाचे थोर विचारवंत मा. हरी नरके, धनगर समाजाचे ज्येष्ट विचारवंत / समाजसेवी मा. के एल खाडे, प्रा. सुधाकर जाधवर, कार्यक्रमाचे आयोजक तथा पाक्षिक धनगर अस्मिताचे मुख्य संपादक श्री प्रकाश खाडे, ऑल इंडीया रिझर्व बॅंक ओबीसी एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष श्री एस एल अक्कीसागर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्तावना प्राचार्य सोमनाथ नजन यांनी केले. या कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र काळे यांनी केले.
होळकरी पगडी आणि खांद्यावर घोंगडे घालुन सोनवणी यांचा सत्कार... आयोजकांतर्फे महाराजा यशवंतराव होळकर चरित्रग्रंथ लेखक संजय सोनवणी यांचा सत्कार. डोक्यावर होळकरी पगडी आणी खांद्यावर घोंगडे चढवुन करण्यात आला. आयोजकांनी ही पुणेरी पगडी नसून होळकरी पगडी असल्याचे माईक वरुन सांगितले. मागच्या दोनशे वर्षात प्रथमच पुण्यात सत्काराचा मान मा. सोनवणी पटकवीला असेही म्हंटले जात आहे. या सत्कार सोहळ्याला चरित्रग्रंथ लेखक सोनवणी यांची पत्नी सौ. पुष्पाताई सोनवणी, कन्या सोनल, पुत्र अनिकेत उपस्थित होते. ग्रंथ लेखक सोनवणी यांनी या वेळी सातवाहन या धनगर शासकाचा तसेच पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे मुळ दाखविणार्या पौंड्र आणि औंड्र यांचा इतिहास उलगडला. महाराजा यशवंतराव होळकर यांचे चरित्रग्रंथ लिहिताना भारावुन गेल्याचे सांगुन आलेल्या अडचणीवर कशी मात केली, हे विशद केले. मा. जानकर तसेच सचिन शेंडगे, प्रकाश पोळ, सनी ए. आदी तरुण वर्गाची साथ मिळाल्याबद्दल लेखकाने त्यांचे खास आभार मानले.
महाराजा यशवंतराव होळकर सेकुलर आणि राष्ट्रवादी होते
- महादेवजी जानकर
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. महादेवजी जानकर आपल्या भाषणात म्हणाले,
महाराजा यशवंतराव होळकर यांना जातीत बसविता येत नाही, त्यांना जातीत बसवु नये. महाराजा यशवंतराव होळकर सेकुलर होते आणि राष्ट्वादी होते. त्यांच्या दरबारी व सैन्यात विविध जाती, धर्म, प्रदेश, राज्ये, वंश तसेच देशाचेही लोक होते. भारताच्या मोठ्या भुभागावर महाराजा यशवंतराव होळकर यांनी ताबा मिळविला होता. एक समाज आणि एक राष्ट्र हे त्यांचे स्वप्न होते. तत्कालीन ब्रिटिशांची राजधानी कलकत्त्यावर हल्ला करुन इंग्रजाना या देशाबाहेर काढणे, हे महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुख्य लक्ष्य होते. परंतु पेशव्यांनी साथ दिली नाही. शिंदे, भोसले आदींनी अडथळे निर्माण केले. मा. जानकर पुढे म्हणाले, महाराजा यशवंतराव होळकर सारखेच आम्हाला आमचा पक्ष- राष्ट्रीय समाज पक्ष देशाच्या चारही सिमांना नेऊन भिडवायचा आहे. संसदेत दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांची भाषणं प्रभावी होताना दिसते. या ओबीसी नेत्यांच्या प्रभावी युक्तीवादा मागे नरके सरांसारख्या थिंक ट्यांकचे योगदान आहे. नरके व सोनवणी सारख्या विचारवंतांची आम्हाला गरज आहे. यापुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर वाकडी नजर टाकणा-यांनी खबरदार व्हावे.अशा प्रकारे जानकर साहेबानी विचारवंताची राजकारणाच्या सबलीकरनातील भूमिका विशद केली. त्याच बरोबर विचारवंताना धमकावणा-या हुकूमशाहाना निर्वाणीचा ईशारा दिला.
धनगर समाजाच्या इतिहासाचे नवे पर्व सुरू
– हरि नरके
" यशवंतराव होळकर हे कधीही पराभूत न झालेले ( पराभव न स्विकारलेले - लेखक सोनवणी यांचे भाषेत ) योद्धे होते. त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकामुळे धनगर समाजाच्या इतिहासाचे नवे पर्व सुरू झाले आहे,'' असे मत ज्येष्ठ अभ्यासक हरी नरके यांनी व्यक्त केले. नरके पुढे म्हणाले, इतिहास घडविण्यासाठी तो माहीत असायला हवा. कोणत्याही लेखकाचे पुस्तक वाचताना वाचक खडबडून जागा व्हायला हवा. सोनवणी यांनी या पुस्तकाच्या रूपाने धनगर समाजाच्या इतिहासाचे नवे पर्व सुरू केले. कधीही पराभूत न झालेला योद्धा म्हणजे यशवंतराव होळकर होय. परंतु, त्यांच्या इतिहासाचे लेखन न झाल्याने ते सर्वांना अपरिचित राहिले. या पुस्तकामध्ये सोनवणी यांनी अभ्यासपूर्ण व सोप्या पद्धतीने होळकरांचे चरित्र मांडले आहे.'' आपल्या अध्यक्षीय भाषण करताना मा. नरके यांनी भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर या संजय सोनवणी लिखित चरित्रग्रंथाचे विश्लेषन आणि मुल्यमापन नि:पक्षपातीपणे केले. महात्मा फुले यांनी शिवरायांचा इतिहास पुनर्जिवित केला. शिवरायांनंतर ज्या माणसाने इंग्रजा सारख्या जगावर राज्य करणार्या बलाढ्य शत्रु विरुद्द टक्कर घेतली, त्यांचा अनेक वेळा (18 वेळा) पराभव केला, अशा महाराजा यशवंतराव होळकर यांचे चरित्र लिहुन संजय सोनवणी यांनी इतिहास पुनर्जिवित केला असल्याचे सांगीतले. सामाजिक असमतोलतेचा तिटकारा बाळगणारे मा.नरकें यांनी नवा जातियवाद रुजवू पाहणा-यांचा समाचार घेताना म्हणाले , केवळ ब्राह्मणांना शिव्या घालणे, ही चळवळ नसून विधायक आणि भरीव कामगीरी करुन तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लढा उभारणे, ही चळवळीची उद्दिष्टे असावी. पण काही वर्चस्ववादी लोक समतेच्या चळवळीत नवीन विष-मत तयार करु पाहत आहेत. वैचारिक मतभेद, मुद्दे खोडण्यात सर्वस्वी असमर्थ असणारी ही माणसे गुद्दयाची बात करतात. या पुढे ते खपवून घेतले जाणार नाही. मा. जानकर यांची साथ मिळाल्याने आम्हाला बळ मिळाले आहे. आज काल इतिहास संशोधकांचे पीक आले आहे. रातो रात इतिहास लिहून नवीन इतिहासकार जन्मास येत आहेत. अजिबात अभ्यास न करता ढापा ढापी करण्यात ही मंडळी सराईत असून खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहेत. हे लबाड लोक विपर्यस्त इतिहास लिहण्यात गढून गेली आहेत. केळूस्कर गुरुजी लिखीत पुस्तकाचे चक्क टायटल बदलणारी, हवं तसं बारसं करुन घेणारी ही नवी पिढी या देशाचं, समाजाचं व इतिहासाचं वाटोळं करुन दम घेणार आहेत. ते पुढे म्हणतात, इंग्रजांकडून इतिहास संशोधनाची शिस्त शिकावी. या कामात त्यांच्या तुलनेने आपण पाच हजार पट मागे आहोत. तटस्थपणा, वस्तुनिष्ठता आणि चिकाटी हे सर्व गुण इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असून गैरसोयीचे असले तरी स्तूनिष्ठता मांडण्याचं धारिष्ट्य सोनवणी सारखा गुणसंपन्न माणूसच करू शकतो.
परस्पर सामंजस्य व परस्पर आदर भावना बाळगावी
– के एल खाडे
धनगर समाजाचे ज्येष्ट विचारवंत के एल खाडे यांनी समाजाच्या काही नेमक्या उणिवांवर बोट ठेवले. परस्पर सामंजस्य व परस्पर आदर भावना बाळगण्याचे त्यांनी आवाहन केले. गत काळातील काही आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, शिवकालाच्या पूर्वीपासून इतिहासामध्ये धनगर समाजाचा मोठा वाटा आहे. यशवंतराव होळकर व नेपोलियन हे दोघेही इंग्रजांचे शत्रू होते. होळकरांनी इंग्रजांना अठरा वेळा पराभूत केले होते. परंतु, आपल्या समाजाचा इतिहास आपणास माहीत नसल्याने समाज मागे राहिला आहे.'' प्रा जाधवर यांनी माधव ( माळी, धनगर, वंजारी) या सामाजिक राज - कारणाची आठवण केली. विश्वासघातकी सहकारींमुळे महानायकांचा घात झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
समाज विश्वास घातकी नाही, लोभामुळे व दिशाभुलतेने तसा वागतो
- अक्कीसागर
ऑल इंडीया रिझर्व बॅंक ओबीसी एम्पलॉइज असोसिएशनचे अध्यक्ष एस एल अक्कीसागर उपस्थितांचे आभार मानताना म्हणाले, 28 ऑक्टोबर 2011 ह्या दिवशी महाराजा यशवंतराव होळकर यांचा 200 वा स्म्रुतीदिन होता. होळ ते भानपुरा व्हाया इंदुर, महाराजा यशवंतराव होळकर 200 व्या स्म्रुतीदिना निमित्त राष्ट्रीय एकात्मता रॅली काढली गेली. मध्यप्रदेश राज्यातील भानपुरा येथील महाराजा यशवंतराव होळकर यांचे छत्रीस्थळी जावुन त्यांच्या स्म्रृतीस श्रद्दांजली वहाणारे मा. जानकर हे एकमेव नेते ठरले. आज महाराष्ट्राची सांस्क्रुतिक राजधानी पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मा. जानकर यांचे उपस्थितीत पार पडत आहे. हा विलक्षण योगायोग आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धनगर अस्मिताचे मुख्य संपादक प्रकाश खाडे यांचे त्यांनी खास अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, धनगर हा भारतातील सर्वात मोठा तसेच मोठा ऐतिहासिक वारसा असणारा समाज आहे. परंतु महाराजा यशवंतराव होळकर यांचेवर चरित्र ग्रंथ लिहिण्यासाठी इंदुरचा क्षत्रिय धनगर समाज 1940 ते 1965 पर्यंत लेखक शोधत होता. ज्येष्ठ इतिहासकार स्व. न.. फाटक लिखित पहिला चरित्रग्रंथ 12 नव्हेंबर 1967 रोजी प्रकाशित झाला. आज 13 नव्हेंबर 2011 रोजी आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 200 व्या स्म्रुतीदिन वर्षात दुसरा चरित्रग्रंथ प्रकाशित होत आहे. आपला समाज विश्वास घातकी नाही, लोभामुळे व दिशाभुलतेने तसा वागतो. चुकीच्या चळवळींमुळे बहुजन शब्द बदनाम झाला आहे. मा. जानकर यांनी राष्ट्रीय समाज हे नवीन बलवाचक नाव दिले आहे. या राष्ट्रावर प्रेम करणारा, या राष्ट्राला सर्वापरी मानणारा तो सर्व राष्ट्रीय समाज. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो वा भाषा- प्रांताचा असो. चरित्रग्रंथ लिहुन महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास पुनर्जिवित केल्याबद्दल संजय सोनवणी यांचे, चरित्रग्रंथाचे वस्तुनिष्ठ तरीही प्रवाही आणि प्रभावी विश्लेषण केल्याबद्दल मा. नरके यांचे श्री अक्कीसागर यांनी विशेष आभार मानले. तसेच इतर मान्यवरांचे आणि तरुण-थोर उपस्थितांचेही त्यांनी आयोजकांतर्फे आभार मानले.
संजय सोनवणी लिखीत व प्रकाशीत पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मा. नरके यांनी आवाहन करताच सर्वपथम 1000 रुपये देवुन मा. जानकर यांनी 10 प्रती घेतल्या. त्याबरोबर हजार - पाचशे रुपये देवुन ग्रंथ विकत घेणार्यांची रांग लागली. हातो हात पहिली आवृत्ती विकली गेली. हा सुध्दा पुस्तक विक्रीचा एक विक्रमी सोहळा होता. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राज्याच्या कानकोपर्यातुन लोक आले होते. यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग होता. यावेळी अखिल भारतीय धनगर समाज युवा ग्रुपचे रोहित पाढंरे, रविंद्र खोरकर, आनंद कोकरे, आनंद गोरे, बापुराव सोनलकर, गोरख डुबे, संतोष जानकर आदी उपस्थित होते. सांगलीचे माजी महापौर प्रा. नितिनराव सावगावे, पुण्याचे माजी महापौर मा. नाना नाशिककर, नगरसेविका सौ. अलकाताई खाडे, किर्लोस्कर / स्त्री / किस्त्रींमचे संपादक विजय लेले, सेवानिवृत लष्करी अधिकारी श्री. फडकेसाहेब, ज्येष्ट धनगर समाज नेते राजाभाऊ लासुरे, विश्व हिंदू परिषदेचे श्री अशोकराव चोरमले, वसुंधरा परिवाराचे अध्यक्ष धनंजय झुरंगे, मावळा संघटनेचे बाळासाहेब कोराटे, माण देश फाउंडेशनचे पदाधिकारी/ रासप नेते अशोकराव माने, मी अहिल्या होणार गं या चित्रपटाचे निर्माते एड. रमेश येडगे, पुण्यश्लोकचे संपादक गणेश पुजारी, अभिमन्यु गाडेकर, डॉ. शरद गलंडे, माजी प्राचार्य शेळकेसर (श्रीरामपुर), हवेपासुन विज निर्मिती करणारे बिरुदेव हजारे, एम डी रामटेके, पत्रकार अमोल पांढरे, धनगर समाजावर पी. एचडी करणारा विध्यार्थी सोमनाथ घोलवे आदी राष्ट्रीय समाजातील विविध सामाजिक / राजकीय संघटनेचे पदाधिकारी / नेते / कार्यकर्त तसेच रासपचे अनेक नेते / कार्यकर्ते मान्यवर गण (रासप नेते दशरथराव राऊत / गोविंदराम सुरनर आदी.) उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विक्रांत काळे आणि टिमने विशेष कष्ट घेतले. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.
 ( यशवंत नायक फिचर्स - संत कनकदास जयंतीदिन - 14/11/2011 )

2 comments:

  1. Thank's to the team RSP Blog ..this information is appropriate to understand for those u wanted to attend this function but can't managed to Attends due to their personal reasons .. as well as to others who are still thinking that they will neglect the movement of Rashtriya (Bahujan) Samaj .
    the event's like this are just an indication how serious the Generation about their rights ...
    Jay Yashawant..!!!!Jay Rashtriya Samaj...!!!!

    ReplyDelete
  2. good blog........... jay malhaar

    ReplyDelete