Tuesday, June 7, 2011

महारानी अहिल्यादेवी होलकर जयंती महोत्सव सम्पन्न

अहिल्या जन्मभूमि चोंडी में

महारानी अहिल्यादेवी होलकर जयंती महोत्सव सम्पन्न

घोटाळे आणि भ्रष्टाचार दडपण्यासाठी कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये समझोता...

- महादेव जानकर यांचा आरोप

अहमदनगर-31/05/11: महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक आदर्श सोसायटी सारखे घोटाळे आणि भ्रष्टाचार दडपण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये समझोता झाला आहे. हे आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. या सरकारला जनतेचे काही एक देणेघेणे नाही. त्यांना फक्त मर्यादित कुटूंबापुरती सत्ता टिकवायची आहे. त्यामुळे भाजप-सेनेच्या तुलनेत कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच खरे जातीयवादी आहेत. असा घ्णाघाती आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या 286 व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त कटगुण येथुन प्रारंभ झालेल्या युवाशक्ती चेतना रॅलीच्या समारोप कार्यक्रमाचे आज चोंडी येथे (ता.31 में 2011) आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री जानकर बोलत होते. जानकर पुढे म्हणाले की, राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती गेल्या 16 वर्षापासून साजरी करीत आहोत. येथेच पक्षाची स्थापना करण्यात आली. आज संपूर्ण भारतभर पक्षाचे काम सुरु आहे. राज्य सरकारला अहिल्याबाई बद्दल काडीमात्र प्रेम-आदर नाही. आता फक्त एकच काम करावयाचे आहे की, हे गेंड्याच्या कातडीचे सरकार खाली खेचायचे आहे. या देशात कॉंग्रेसनेच जाती-पातीचे आणि धर्माचे घाणेरडे राजकारण केले आणि प्रत्येक राज्यात मूठभर लोकांना हाताशी धरुन आपली पोळी भाजून घेतली. कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांवर आरोप करुन आपली पोळी भाजून घेत आहेत. लवकरच राज्यातील आणखी एक मोठा घोटाळा बाहेर पडणार असल्याने तसेच आदर्श घोटाळ्यात हे दोन्ही पक्ष गुंतल्याने हे दोन्ही प्रकरणे दडपण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आपसात समझोता झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासप प्रदेशाध्यक्ष पुंडलिक मामा काळे होते. तसेच कर्नाटकचे माजी अर्थमंत्री एच.एम. रेवन्ना, माजी आमदार जनार्दन तुपे, कैलास दिवाण (राष्ट्रीय महासचीव-पश्चिम बंगाल), ललितभाई पटेल (गुजरात रासप अध्यक्ष), झारखंडचे खासदार सूरज मंडल, . सत्यप्रकाश (कर्नाटक रासप महासचीव), गणेशराम देवासी (कर्नाटक रासप अध्यक्ष), एम जी मणीशंकर (तामिळनाडु रासप अध्यक्ष), श्री घनशाम होलकर (राजस्थान) रासप सल्लागार एम.आर.खान., कर्जत-जामखेडचे आमदार प्रा.राम शिंदे, अहमदनगर जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दादाभाऊ चितळकर, अहमदनगर जिल्हा बॅंकेचे माजी संचालक रविंद्र मासाळ, अहमदनगर रासप जिल्हा अध्यक्ष भानुदास हाके, सरचिटणीस महेंद्र शिंदे, प्रा. सुशिला मोराळे, सचिन मासाळ, आर एम पाल, भाऊसाहेब वाघ, नारायण देवासी, हनुमंतप्पा पुजेर या प्रमुख मान्यवरांसह हजारोंचा जनसुदाय उपस्थित होता.

वाघ्या पुतळयास हात लावल्यास राष्ट्रीय समाज पक्ष जशास तसे उत्तर देईल...

मा. जानकर पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सर्वप्रथम रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची उपेक्षित समाधि शोधुन लाढली. महाराज तुकोजी होळकर यांनी दिलेल्या 5000 रुपयांच्या देणगीतुन रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधि आणि वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसविला. परंतु रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याची भाषा करणा-या तथाकथित संघटनांनी पुतळयास हात लावल्यास राष्ट्रीय समाज पक्ष जशास तसे उत्तर देईल, असा इशारा जानकर यांनी दिला. यामागे सांस्कृतिक लढा नसुन राष्ट्रवादी कॉग्रेस चे राजकारण असल्याचा दावा त्यांनी केला. फुले शाहु आबेडकर विचाराना प्रमाण माननारी आमची रासपा सेक्युलर पक्ष आहे. आम्ही कोणत्याही जाती-धर्म विरोधी नाही. आम्ही ब्राह्मण विरोधी नसून ब्राह्मण्यवाद विरोधी आहोत. माझा पहिला पंचायत सभा मेंबर मराठा होता, माझा पहिला आमदार मराठा आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हा पक्ष नसून, बारामती विकास महामंडळ आहे. राज्यातील मोजक्याच टग्यांना बरोबर घेऊन काढलेला हा पक्ष असुन या टग्यांची सत्तेची मस्ती उतरवण्यासाठी रासपा आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये पुर्ण ताकदीनिशी उतरेल आणि त्यांना सत्ते पासून रोखेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. माढा लोकसभा मतदारसंघात मी उभा राहिल्या मुळेच शरद पवारांना धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात देण्याची उपरती झाली. मात्र, आज दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी काय त्याचे काय झाले? राज्यात, देशात तेच सत्तेवर आहेत. निवडणूकामध्ये जनतेला भूलथापा मारायच्या, निवडून यायचे, अन् सत्ता उपभोगायची एवढाच उद्द्योग कॉंग्रेस- राष्ट्रवादी कडून होताना दिसतो. शरद पवार हेच मुळात थापेबाज असल्यांची टीका त्यांनी यावेळी केली

ओबिसी शक्ति काय आहे हे आम्ही त्यांना दाखवुन देवु...

सुखाच्या काळात आठवले शरद पवारांबरोबर होते. परंतु आम्ही त्यांना दुःख प्रसंगात साथ दिली आहे. परंतु भिमशक्ती, शिवशक्ती बरोबर घेवुन जाताना आठवले साहेबांनी ओबिसी शक्तीचा विचार केला नाही. ओबिसी शक्ति काय आहे हे आम्ही त्यांना दाखवुन देवु , असेही जानकर म्हणाले. रिडालोसतून रामदास आठवले बाहेर पडले असले तरी रिडालोस मधील एकही घटक पक्ष त्यांच्याबरोबर जाणार नाही असा निर्वाळा त्यांनी दिला. तसेच येणा-या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणाही मा. जानकर यांनी केली.

राष्ट्रीय समाज पक्ष एक 'राष्ट्र'व्यापी राष्ट्रीय पक्ष...

अहिल्या जन्मभुमी चोंडीत रासपाचे एकुण 6 राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे रासपा राष्ट्र व्यापी राष्ट्रीय पक्ष बनला असल्याचा तसेच प्रत्येक मतदारसंघात किमान 10 हजार मिळवु शकत असल्याने तळा गाळातल्या सामान्य माणसालाही लोक प्रतिनिधी होण्याची संधी रासपा मध्ये निर्माण झाली असल्याचा दावा मा. जानकर यांनी यावेळी केला. कर्नाटकचे माजी अर्थमंत्री रेवन्ना यांनी देशात वाढलेला भ्रष्टाचार, महागाई, गरीबी, बेकारी या बद्दल असंतोष व्यक्त केला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जन्मगावी चोंडी येथे मला कर्नाटक राज्यातुन येण्याची संधी मिळाली. अहिल्यादेवीच्या न भुतो कार्याची ओळख पटली. त्यांच्यावर प्रेम करनार्या विराट जनतेचे दर्शनही घडले. याबद्दल रेवन्ना यांनी महादेव जानकर यांचे आभार मानुन संतोष व्यक्त केला. तसेच राज्यात महादेव जानकर यांचे काम चांगले वाढल्याचेही त्यांनी सांगितले. एक सक्षम पर्याय म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष समाजात-देशात परिवर्तन घडवून आणू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नव निर्वाचित कर्नाटक रासप महासचीव (युवा नेता) श्री ई. सत्यप्रकाश चोंडीत पहिल्यांदाच आले होते. ते आपल्या भाषणात म्हणाले , लिडर दो किस्म के होते है. एक लिडर किसीका फालोअर होता है. दुसरा लिडर (नेता) को पैदा करता है. महादेव जानकर लिडर पैदा करने वाले लिडर है. लेपर्ड ( चित्ता ) जीने के लिये कुछ भी खाता है. लेकिन शेर सिर्फ हंट ( शिकार) करके खाता है. महादेव जानकर शेर है, अपने हंट पर जीता है. अहिल्या जन्मभुमी में आकर मुझे अपनी विशाल विरासत में आने का सौभाग्य प्राप्त हुवा. इससे हम धन्य हुये है. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथे राज्यातील देशाच्या कानाकोप-यातून हजारो अहिल्याप्रेमी आणि जानकरप्रेमी हजेरी लावत असतात. या अहिल्याप्रेमापायीच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष दादाभाऊ चितळकर यांनी पाण्याची, तर भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी जेवणाची सोय केली होती. यावेळी झारखंडचे मा.खासदार सूरज मंडल, दशरथ राउत, नारायण चाळगे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. या कार्यक्रमास महादेव जानकर यांना गेवराई (जिल्हा बीड) तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एक लाख, एक हजार रुपयांची थैली अर्पण केली. तसेच एका पोष्टमनने (एस वी देवगुंडे, माजलगाव बीड) आपला एक महिन्याचा पगार दिला. पुंडलिकमामा काळे यांनी 25 हजार रुपयांची सहयोग निधि दिला. दरम्यान अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ... भगवान महाराज गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारीच्या किर्तनाने सांगताही झाली. जयंतीनिमित्त दिवसभर हजारो अहिल्याप्रेमीनी चोंडीला भेटी दिल्या. मी अहिल्या होणार गं ! या अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित अड, रमेश येडगे निर्मित चित्रपटाच्या चित्रिकरणास मा.महादेव जानकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अड. शफीक परकार संघटक महाराष्ट्र रासप यांनी प्रास्तविक केले, प्रा. सुभाष भिंगे महासचिव महाराष्ट्र रासप तसेच सचिन माने कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र रासप यांनी सुत्र संचलन केले. अहमदनगर रासप जिल्हा अध्यक्ष मेजर भानुदास हाके यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment