Thursday, November 25, 2010

युवा शक्ती हिच खरी राष्ट्र शक्ती : महादेव जानकर
मुंबई ( प्रतिनिधी )
देशात सध्या बेरोजगारी वाढत असून, या युवा शक्तीच्या हाताला काम देण्याऐवजी प्रस्थापित राजकीय मंडळी मात्र आपली घराणेशाही वाढविण्यासाठी या युवा शक्तीचा गैरफायदा घेत आहे. '' युवा शक्ती हिच खरी राष्ट्र शक्ती आहे.'' या युवा शक्तीला घराणेशाहीच्या गुलामगिरीतून, दारिद्र्याच्या चक्रव्युव्हातून मुक्त करण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. महादेव जानकर यांनी बोरीवली येथे केले.
बोरीवली, मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे युवा शक्ती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना जानकर म्हणाले की, भारताच्या एकूण लोकसंख्येंच्या साठ टक्के ( 60%) युवा वर्ग हा शिक्षणापासून, रोजगारापासून वंचित असून नैराश्याने ग्रासलेला आहे. त्यांची चारहीबाजूनी कोंडी झालेली आहे. आगामी काळात युवा जागृती आणि योग्य दिशा देण्याच्या द्रुष्टीने ' बेरोजगारी हटवा आणि युवा शक्ती वाचवा' हा विशेष कार्यक्रम रासपाने हाती घेतला आहे. युवा वर्गाने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. जानकर यांनी यावेळी केले.
1 ) घराणेशाही हटवा आणि लोकशाही वाचवा 2 ) भेदाभेद हटवा आणि राष्ट्र वाचवा 3 ) बेरोजगारी हटवा आणि युवा शक्ती वाचवा 4 ) शेतकरी वाचवा आणि देश वाचवा 5 ) रासपाचा जाहीरनामा - राष्ट्रीय संकल्पनामा असा पाच कलमी कार्यक्रम राष्ट्रीय समाज पक्षाने हाती घेतला असून, कार्यकर्त्यांनी युवा वर्गांनी हा कार्यक्रम गाव-तालुका-जिल्हा-शहर पातळीपर्यंत घेवून जावे, असे आवाहन रासपा महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रा. सुभाष भिंगे यांनी केले. या कार्यक्रमास मोहन अडसूळ ,लोजप नेते ; रासपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, लेखक गोविंदराम शूरनर; पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष, दशरथ राउत; मराठवाडा संपर्क प्रमुख, बाळासाहेब दोडतले; प्रवक्ते, निखील भातंब्रेकर; युवा नेते, एस. अक्कीसागर; मुंबई युवा अध्यक्ष, संतोष मेटकरी; अभिनेत्री, अपुर्वा खट्टी; निर्माते, विशाल सावंत; अभिनेता, सोमनाथ तडवळकर; डॉ. प्रभाकर स्वामी, भीमराव लवटे, आदिनाथ कोळेकर, महादेव कोकरे, बाळासाहेब आखाडे, बबन शेंडगे, सुनील बंडगर, फकीरा आली खान आदि मान्यवर उपस्थित होते. दाजी मारकड आणि हरिभाऊ वाघमोडे यांनी सूत्रसंचालन तर आभार बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

Monday, November 15, 2010

राष्ट्रीय समाज युवा शक्ती मेळावा !!!!

नवरात्री- दसरा- दीपावली, राष्ट्रीय समाज आठवती राणी विंध्यावली - राजा बळी !!!

जय राष्ट्रीय समाज बोलो.... बोरीवली - मुंबई चलो !!!!
राजा
बळी - राणी विंध्यावली - नवरात्री - दसरा - दीपावली निमित्त....

' राष्ट्रीय समाज युवा शक्ती मेळावा '
कार्यक्रमाचे
आयोजन... !दिनांक : 14 / 11 / 2010 रोजी...
स्थळ : बोरीवली ( ) , कुलूपवाडी, दुपारी 4.00 वा.


प्रमुख मार्गदर्शक : मान्य. महादेवजी जानकर ( राष्ट्रीय अध्यक्ष, रा. . )
इतर पाहुणे मार्गदर्शक : प्रो.भींगे सर, अड़. शफीक परकार, पुंडलिक ( मामा ) काळे , दशरथ राउत , गोविंदराम शुरनर, बालासाहेब दोडतले इतर मान्यवर ...

( अधिक माहितीसाठी संपर्क RSP : 022 - 22618510 / 09272134688 )